ब्रेकिंग मर्डर! राजुरा येथे गोळ्या झाडून व्यावसायिकांचा मर्डर…

1562

राजुरा- राजुरा येथील नाका नंबर तीन चौकात आज सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान एका कोळसा व्यावसायिकाची हत्या झाल्याची थरारक घटना घडली आहे.

सविस्तर असे की, आज सायंकाळी राजुरा येथील मयूर हेयर स्टाईल सलून मध्ये रामपूर येथील ट्रान्सपोर्ट आणि कोळसा व्यावसायिक राजू यादव कटींग करायला आले होते. कटींग करत असतांना अज्ञान मारेकऱ्यांनी यादव यांच्यावर देशी कट्याने गोळ्या झाडल्या. यात राजू यादव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रामपूर शहरातील एक प्रतिष्ठित व्यावसायिक असलेले राजू यादव हे जय भवानी ट्रक असोसिएशनचे सचिव असून त्यांचे स्वतःचे बजरंगबली ट्रान्सपोर्ट आहे. तसेच ते बजरंग दलाचे महासचिव होते. बऱ्याच वर्षांपासून ते बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील कोळसा खाणींमध्ये त्यांचा वाहतुक व्यवसाय सुरू होता. राजु यादव यांची पूर्व वैमनस्यातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.