धक्कादायक! पहिले शारीरिक संबंध नंतर गळा दाबून पत्नीची हत्या…

986

उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात शनिवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने आपल्या पत्नीसोबत शरीरसुख उपभोगल्यानंतर त्याच रात्री पत्नीचा गळा दाबून खून केल्याचं समोर आलं आहे. रविवारी त्या महीलेचा मृतदेह शेतात आढळल्यानंतर ही उघडकीस आली आहे. महीलेच्या कुटुंबीयांनी पतीविरूध्द गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये पतीने खूनाची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी असलेल्या महिलेच्या पतीचे नाव अमित लाल आहे. तो कानपूर देहात जिल्ह्यातील नासीरपूर गावात रहिवासी आहे. पत्नी कांचन हमीरपूरला तिच्या माहेरी आई-वडिलांकडे राहत होती. त्या दोघांच्या लग्नाला तीन वर्ष झाली असून त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.

अमित आणि त्याचे कुटुंबीय कांचनचा छळ करत होते. यामुळे पती-पत्नीत सतत भांडण होत होते. त्यामुळे या भांडणाला कंटाळून कांचन हमीरपूरला तिच्या आई-वडिलांकडे निघून गेली. कांचन दोन फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. कांचनच्या आई-वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी पोलिसात नोंदवली. कांचन बेपत्ता होण्यामागे तिचा पती अमित याच्यावर संशय असल्याचे कांचनच्या आई-वडिलांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवले आणि पोलिसांनी कांचनचा पती अमित लाल याला ताब्यात घेतले. पोलिसांनी अमितची कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच अमितने गुन्ह्याची कबुली दिली.

अमितने पोलिसांना सांगितले की, कांचनला पैसे देण्याच्या बहाण्याने हमीरपूरमध्येच बाहेर भेटायला बोलावले. तिला भेटल्यानंतर गोड बोलून तो तिला शेतात घेवून गेला. त्यानंतर कांचनसोबत शरीरसुख उपभोगले आणि तिथेच तिचा तिच्याच ओढणीने गळा दाबून खून केला. खुनानंतर कांचनचा मृतदेह शेतामध्ये लपवला आणि तिचा मोबाइल नदीत फेकून दिला. पोलिस अधिकारी अनुराग सिंह यांनी या संदर्भात माहिती दिली.