अभिनंदन…ती झाली वयाच्या २१ व्या वर्षी गावची सरपंच…

966

दौंड : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून आता सरपंचपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. ठिकठिकणी अनेक जण सरपंच होण्यासाठी देव पाण्यात टाकून चातकाप्रमाणे सोडतीकडे लक्ष ठेवून आहे. पण दौंडमध्ये वयाच्या अवघ्या 21 वर्षी तरुणीने सरपंचपद पटकावले आहे.

दौंड तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्नेहल संजय काळभोर यांची वयाच्या 21 व्या वर्षी बिनविरोध सरपंचपदी निवड करण्यात आली आहे.

दौंड तालुक्यातील सर्वात कमी वयाच्या सदस्य म्हणून स्नेहल काळभोर या खडकी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी पहिल्यांदा निवडणून आल्या होत्या आणि आता त्यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडल्याने सर्वात तरुण सरपंच होण्याचा मान स्नेहल काळभोर यांना मिळाला आहे.