व्ही कॅन फाऊंडेशन आणि निव प्रेरणा फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम; खैरगुडा येथे आरोग्य किटचे वाटप…

316

राजुरा- राजुरा तालुक्यातील खैरगुडा या छोट्याशा गावात वरील फाऊंडेशन द्वारे जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी राजे जयंतीचे औचित्य साधुन जि .प शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्य किटचे साहीत्य वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोट्या उत्सवात साजरी करण्यात आली सोबतच विध्यार्थीना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी फाऊंडेशन चे मंगेश भोगे सर, अमोल कोहडे सर, शिरीष भोगावार सर, डॉ.प्रवीण लोनगाडगे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचीचे अध्यक्ष तुळशीराम चनकापुरे होते. जि प शाळेचे मुख्याध्यापक श्री नरेश कोरडे सर, श्री संजीव वाकले सर, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय पदधीकारी, गावातील तरुण मित्र स्वप्नील कोहपरे, किरण आत्राम, सुरज सुरकार, आशिष चनकपूरे, राजु कुळसंगे, बबलु चनकापुरे, सुमित कोहपरे, अमित येवले, अजय चौदरी, रीतीक भटरकर, राजकुमार आत्राम व गावातील लोकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती
कार्यक्रमाचे संचालन श्री.संजीव वाकले सर तर आभारप्रदर्शन रोशन येवले यांनी केले