चंद्रपूर: विज उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्हातील नागरिकांना २०० युनिट पर्यत मोफत विज देण्यात यावी अशी मागणी पून्हा एकदा आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे. तसेच चंद्रपूरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने प्रयत्न करत वन पर्यटनासह चंद्रपूरात एतिहासीक व औद्योगीक पर्यटनही सुरु करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकार तर्फे सादर केलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या प्रस्तावाला समर्थन देतांना ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यपाल यांनी ताडोबा दर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही चंद्रपुरातील पर्यटन स्थळांना भेट देऊन येथील पर्यटनाला चालना मिळावी याकरीता यावर्षीच्या बजेट मध्ये वाढीव निधी देण्याची विनंती केली, चंद्रपुरातील जनता प्रदूषण युक्त वातावरणात राहून राज्याला वीज देण्यासाठी मोठा त्याग करीत आहे. अशात शासनाने चंद्रपूरकरांना २०० युनिट पर्यंन्त वीज मोफत देण्याची मागणी पुन्हा एकदा सभागृहात त्यांनी केली. तसेच चंद्रपूरात कोळसा खाणी, पेपर मील, विजनिर्मीती केंद्र, सिमेंट कारखाने यासारखे मोठे उद्योग आहे.
या उद्योगांचाही पर्यटनाच्या दृष्टिने विचार करुन आद्योगीक पर्यटन सुरु करण्याच्या दिशेने पर्यत्न केले जावेत, चंद्रपूर शहराला ऐतिहासीक असे परकोट आहे. त्यामुळे ऐतिहासीक पर्यटनासाठीही हा जिल्हा योग्य असून येथे विविध प्रकारचे पर्यटन सुरु करता येवू शकतात याकडे आमदार जोरगेवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको -प्रो संस्थेचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेतल्याबद्दल आ. जोरगेवार यांनी ना. आदित्य ठाकरे यांचे धन्यवाद माणले. तसेच शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचा-यांना ८ महिण्यांपासून वेतन मिळत नाही. याकडे लक्ष देण्याची गरज यावेळी आ. जोरगेवार यांनी व्यक्त केली. चंद्रपूरातील अमृत कलश योजना अजूनही पूर्ण झालेली नाही याकडेही यावेळी आ. जोरगेवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले तसेच नव्याने निर्मीत झालेल्या घुग्घुस नगर परिषदेला या अर्थसंकल्पात भरघोस निधी मिळावा अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलतांना अधिवेशनात केली आहे.
*आमदार किशोर जोरगेवार यांनी संताप व्यक्त करताच गॅलरीतील आमदारांना मिळाला लॅपटाँप*
कोरोनामूळे अधिवेशनात सामूहिक अंतर राखल्या जावे यासाठी काही आमदारांना गॅलरीत बसविण्यात आले आहे. मात्र या आमदारांना लॅपटाँप दिल्या गेल्या नसल्याने सभागृहातील कामकाज पाहण्यास अडचण येत होती. यावर काल चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार यांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनतर आज येथील सर्व आमदारांना लॅपटाँप उपलब्ध करुन देण्यात आले.
मध्यंतरी कमी झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. अशातच अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असल्याने सभागृहात कोरोना बाबतचे सर्व नियम पाळल्या जात आहे. अधिवेशनादरम्याण सामुहिक अंतर पाळल्या जावे या करीता एका बेंचावर एका आमदारालाच बसविण्यात येत आहे. तर उर्वरीत आमदारांसाठी सभागृहातील गॅलरी येथील बेंचेस आरक्षीत करण्यात आले आहे. मात्र गॅलरीत बसणा-या आमदांराकडे लॅपटाँप न दिल्या गेल्याने सभागृहातील कामगाज पाहणे व ते समजने अवघड झाले होते. त्यामूळे काल राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी या प्रकारावर असंतोष व्यक्त केला होता. याची दखल सभागृहाच्या वतीने घेण्यात आली असून आज पासून गॅलरीत बसणा-या सर्व आमदारांना लॅपटाँप उपलब्ध करुन देण्यात आले आहेत…