#india Dastak News Tv
नांदेड: जिल्ह्यात मागील काही काळापासून अवैध वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. या तस्करीला थांबण्यासाठी प्रशासन कुठलीच उपाययोजना करत नसल्याचे दिसून येत आहे. उलट प्रशासनाचे काही अधिकारी या माफियांना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे.देगलूर तालुक्यात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अडवलेला वाळूचा ट्रक हा आमदारांचा आहे, असे हायवा चालकाने सांगताच तो सोडून देण्यात आला. कारवाई करण्यासाठी आलेले वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी कारवाई न करता रिकाम्या हाताने परत गेल्याची माहिती मिळत आहे.
दोन वर्षांपासून वाळू केंद्राचा लिलाव झाला नाही. वाळू माफिया लोकप्रतिनिधी, पोलिस,आरटीओ, महसूल यंत्रणेला हाताशी धरून दिवसरात्र वाळूची तस्करी करत आहेत.
ही वाळू सर्वसामान्य लोकांना परवडणारी नसल्याने अनेकांनी बांधकाम थांबवले आहे. बिलोली तालुक्यातील हुनगुंदा येथून आणि तेलंगणातून वाळू आणून विक्री केली जात आहे. तीन दिवसांपूर्वी देगलूर शहरात भरदिवसा वाळूने भरलेला एक हायवा ट्रक सामाजिक कार्यकर्त्यांनी अडवून तपासणी केली असता या हायवा चालकाकडे केवळ दोन ब्रास वाळूची रॉयल्टी होती आणि या हायवामध्ये सहा ते सात ब्रास वाळू होती.
त्यामुळे या कार्यकर्त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना पाचारण केल.अधिकारी आले ही, मात्र ही हायवा आमदार साहेबांची असल्याचे हायवा चालकाने सांगताच आलेले अधिकारी आल्या पावली परत गेले. रॉयल्टीच्या क्षमतेपेक्षा जास्त असलेल्या वाळूवर कारवाई तर सोडाच दंड वसूल करण्याचेही धाडस केले नाहीत.