Homeचंद्रपूरगोंडपिंपरीसचिन मुंगले या युवकाचा कोरोनाने मृत्यू...तालुक्यात पसरली शोककळा

सचिन मुंगले या युवकाचा कोरोनाने मृत्यू…तालुक्यात पसरली शोककळा

नागेश इटेकर
तालुका प्रतिनिधी

गोंडपिपरी:चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सध्यस्थितीत कोरोनाचा कहर फक्त शहरात दिसून येत होता.आता मात्र कोरोनाने ग्रामीण भागात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. गोंडपिपरी तसेच तालुक्यातील चेक बोरगाव,धाबा,गोजोली इतर भागात कोरोना ग्रस्त रुग्ण आढळले आहे.दिवसेंदिवस हा आकडा मोठा होत असून चिंता जनक परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.

अश्यातच आज दिनांक १५/४/२०२१ रोजी गोंडपिपरितील प्रतिष्ठित व्यापारी सचिन मुंगले याचे कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला.३० वयोगटातील युवक असून सुशिक्षित,गोड स्वभावाचा आणि सधन कुटुंबातील होता.बऱ्याच दिवसापासून प्रकृतीत बिघाड असल्याने,आज अधिक उपचारासाठी स्थानीक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. असा आकस्मिक रित्या कोरोनाने सचिन मुंगले या युवकाचा बळी घेतला.तालुक्यातील कोरोनाचा हा दुसरा बळी आहे. जवान मुलाचा असा दुर्दैवाने अंत झाल्याने गावातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!