पवईतील डॉक्टर संकेता सिंग यांच्या कडुन विडिओ द्वारे जनजागृतीपर संदेश…

337

पवई प्रतिनिधी :सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यात हे बदलते वातावरण गेली काही दिवस मुंबई मध्ये सुरु असलेला मुसळधार पाऊस त्यामुळे एस वार्ड ला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या पंपिंग स्टेशन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा खंडीत होता.

जलवाहिनी मधील बिघाड दुरुस्ती नंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला तर खर परंतु पावसाचा जोर कायम असल्याने जलवाहिनी मधून एस वार्ड अंतर्गत येणाऱ्या विभागात आज झालेला गढुळ पाणीपुरवठा झाल्यामुळे पवईतील चैतन्य विभागातील डॉ संकेता सिंग यांनी विडिओ द्वारे जनतेला जनजागृती केली आहे.

सदर विडिओ मध्ये त्यांनी एस वार्ड अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरिकांना पावसाळ्यात येणाऱ्या गढुळ पाण्यामुळे होणाऱ्या टायफॉईड, डायरिया, पोटदुखी अशा आजारापासून कसे अलिप्त राहता येईल यांचे मोलाचे मार्गदर्शन केले आहे.कोरोना वायरसचा प्रादुर्भाव आणि त्यात पावसाळ्यात होणारे साथिचे आजार कसे दुर करता येईल याचे मार्गदर्शन या विडिओ मार्फत डॉ संकेता सिंग यांच्या वतीने एस वार्ड अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.