१५ ऑगस्ट रोजी महानगरपालिकेत ७४ वा वर्धापनदिन होणार साजरा

241

चंद्रपूर, दि. १३ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात रविवार, दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ७.४० वाजता भारतीय स्वातंत्र्याचा ७४वा वर्धापन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त महानगरपालिका कार्यालय इमारतीवर महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. कार्यक्रमाला उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

गतवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कोरोना विषाणूची साखळी तोडण्या करिता शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करून वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे.

१५ ऑगस्ट २०२१ रोजीचे कार्यक्रम
१. महानगरपालिका कार्यालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण : सकाळी ७.३० वा.
२. महानगरपालिका कार्यालय इमारतीवर ध्वजारोहण व मानवंदना : सकाळी ७.४० वा.
३. प्रभाग कार्यालय क्र. १, संजय गांधी मार्केट ध्वजारोहण व मानवंदना : सकाळी ७.५५ वा.
४. प्रभाग कार्यालय क्र. २, कस्तुरबा भवन ध्वजारोहण व मानवंदना : सकाळी ७.५५ वा.
५. प्रभाग कार्यालय क्र. ३, देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा, ध्वजारोहण व मानवंदना : सकाळी ७.५५ वा.
६. जटपुरा गेटजवळील महात्मा गांधी यांचे पुतळ्यास माल्यार्पण : सकाळी ८.१५ वा.
७. हुतात्मा स्मारक वाचनालय येथे ध्वजारोहण व मानवंदना : सकाळी ८.२५ वा.