तुकुम परिसरातील एकता चौकात घाणीचे साम्राज्य… संसर्गजन्य रोगांची नागरिकांमध्ये भीती…लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; मुक्या जनावरांच्या जिवास धोका…

367

सुयोग अवथरे (शहर प्रतिनिधी चंद्रपूर)

चंद्रपूर :– “स्वच्छ भारत… स्वच्छ शहर” हा नारा कागदावरच शोभेची वस्तू बनली असून यासाठी प्रशासनाकडून लाखो करोडोंचा निधी मुरतय कुठे असा खडा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. शहरातील लोकप्रतिनिधी “स्वच्छ शहर.. सुंदर शहर” असे पोस्टर लावीत टेंबा मिरवीण्यास अव्वल स्थान प्राप्त करण्याच्या शर्यतीत असेल तरी खरी परिस्थिती वेगळीच असून महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरात एकता चौकात कचऱ्याचे ढिगारे नागरिकांसह मुक्या जनावरांच्या जिवास धोका ठरत आहे.यामुळे लोकप्रतिनिधींची अकार्यक्षमता स्पष्ट होत असून फक्त निवडणुकीच्या वेळेस लोकप्रतिनिधी उदयास येतात अशी चर्चा परिसरात जोर धरत आहे. या समोर नागरिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा संदेश नागरिकांकडून समोर आला आहे. शहराच्या स्वच्छते करिता लाखो करोडो रुपयांचा निधी वापरला जातो.

तो निधी नागरिकांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने केला जातो मात्र त्यांनी त्यांचा विल्हेवाट स्वच्छतेच्या दृष्टीने करणे हे काम स्थानिक लोकप्रतिनिधी तथा प्रशासनाची असते तसेच शहर स्वच्छतेवर भर देणे तितकेच महत्त्वाचे असते मात्र तूकुम परिसरातील एकता चौकात घाणीचे साम्राज्य असून परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.

एकीकडे कोरोनासारख्या संसर्गजन्य विषाणूशी लढणाऱ्या नागरिकांनी कंबर कसली आहे मात्र भर रस्त्यात कचऱ्याच्या ढीगाऱ्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहराची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे कोरोना ची धास्ती एकता चौकातील अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात कोरोना वर मात करता करता दुसऱ्याच आजारांने तोंड वर काढल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.

चंद्रपूर शहरातील स्वच्छतेवर निधी खर्च होतो हे शहरातील अस्वच्छता यावरून स्पष्ट होते. रस्त्यावरील कचरा हा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचे काम करीत आहे तर लोकप्रतिनिधी कुंभकर्णाची भूमिका बजावत आहे. शहर स्वच्छतेवर भर असल्याची ओरड लोकप्रतिनिधी तथा प्रशासनाकडून केली जात असली तरी नाली रस्त्यावर असणारी घान व कचरा हे स्वच्छतेबाबत किती जागृत आहे हे स्पष्ट होते. एकता चौकात असलेली अस्वच्छता पाहता एखाद्या अन्य संसर्गजन्य आजाराने तोंड वर केल्यास त्याचे विपरीत परिणाम हे सर्व शहरवासीयांना भोगावे लागतील. याला जबाबदार कोण? नागरिकांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.