गौरव शामकुळे नी पकडला राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

332

मूल- चळवळीतील कार्यकर्ता, कामगार नेता, आप आदमी पक्षाचे युवक अध्यक्ष अशी वाटचाल करीत सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा कार्यकर्ता अशी ओळख निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूबभाई आणि जिल्हा निरीक्षक आमदार चंद्रिकापुरे साहेब,माजी खासदार मनोहर कुकडे साहेब, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य याच्या प्रमुख उपस्थितीत युवक अध्यक्ष नितिन भटारकर याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केले
गौरव शामकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा पकडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला युवकांचा भक्कम आधार तालुक्यात मिळणार असून गौरव शामकुळे यांच्या पक्षातराची सध्या सर्विकडे चर्चा सुरू आहे .
शामकुळे यांना घेण्यासाठी अनेक पक्षाचे पदाधिकारी संपर्कात होते पण शरद पवार निष्ठावंत एका कार्यकर्त्याने हा पक्ष प्रवेश घडवून बाजी मारल्याची पण चर्चा सध्या सुरू आहे.
पक्षाच्या पदाधिकारी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून शामकुळे यांच्या प्रवेशाबद्दल स्वागत करून अभिनंदन करीत आहेत.
शामकुळे यांनी आपल्या पक्षप्रवेशाबद्दल बोलताना आदरणीय पवार साहेबाच्या विचाराणा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ भटारकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात पक्षवाढीसाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी सतत प्रयत्नरत राहण्याचा निश्चय असल्याचा सांगितले.