किरकोळ वादातून धारधार शस्त्राने वार करत केला खून,आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे…

639

प्रतिनिधि-
दिलीप सोनकांबळे

निगडी पुणे :
किरकोळ वादातून पाचजणांनी मिळून एकाचा धारधार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना सोमवारी (दि. 20) मध्यरात्री घडली. खून करणाऱ्या आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

संपत भीमराव गायकवाड (वय 45, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत चाळ, ओटास्कीम, निगडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी संध्या संपत गायकवाड (वय 36) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वैभव उर्फ बिचू संतोष अडागळे, संतोष अडागळे (रा. ओटास्कीम, निगडी) याच्यासह तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संपत गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी परिसरात सुरू असलेल्या मुलांचे भांडण सोडविले होते. त्यावेळी चिडलेल्या आरोपींनी गायकवाड यांच्या घरावर दगडफेक केली होती. गायकवाड यांनी आरोपींना याबाबत जाब विचारून दम दिला होता.

त्यामुळे आरोपी त्यांच्यावर चिडून होते. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री गायकवाड आणि आरोपींमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी आरोपींनी गायकवाड यांना बेदम मारहाण केली. यामध्ये गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.