ब्रेकिंग न्यूज: आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..परिक्षेच्या प्रवेशपत्रात चुका; विद्यार्थी चिंतेत

1321

सहसंपादक चक्रधर मेश्राम

आरोग्य विभागाच्यावतीने विविध रिक्त पदाकरिता राज्यात परीक्षा घेण्यात येत आहेत. या परिक्षेसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रामध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याचे समोर आले आहे. असाच एक प्रकार जालन्यातही घडला आहे. जालन्यातील विद्यासागर रामभाऊ पवार या विद्यार्थीनीचे आधार कार्डवर नाव आहे. मात्र आरोग्य विभागाच्या परिक्षेच्या प्रवेशपत्रावर तिचे नाव विद्या रामभाऊ पवार असे आले आहे. त्यामुळे प्रवेशपत्रात बदललेल्या नावाने परीक्षा कशी द्यावी ? या चिंतेत विद्यार्थीनी आहे. ईटीव्ही भारतच्या माध्यमातून या विद्यार्थीनीने अशी मागणी केली आहे की, अवघ्या दोन दिवसावर आलेल्या परीक्षा पुढे ढकलाव्यात किंवा ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रावर काही चुका आहेत, त्या त्यांना तात्काळ दुरुस्त करून द्याव्यात. पण ते काम करणार तरी कोण? सर्व हक्क खाजगी एजन्सीचे असेल तर मग वेळोवेळी उद्भवणारे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी उपस्थित एजन्सीचे खाजगी प्रामाणिकपणे काम करणारे व्यक्ती आहेत का❓.
महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या विविध प्रकारची पदे भरली जावी यासाठी उद्या दिनांक 25/26 सप्टेंबर रोजी खाजगी एजन्सीचे माध्यमातून परिक्षा घेऊन पदे भरण्यात येणार आहेत. या परिक्षेच्या निमित्त्याने आरोग्य विभागाचा महाघोटाळा आणि प्रचंड प्रमाणात होणारा भ्रष्टाचार समोर येत आहे.
या परिक्षेत दत्ता पातुरकर या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांला चक्क उत्तर प्रदेश मध्ये परिक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्याच्या प्रवेश पत्रावर नोएडा सेक्टर 15 असे छापून आले आहे. केवळ पुणे नाही तर वाशीम जिल्ह्यातील एका विद्यार्थीला नोएडा सेंटर मिळाले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या या भरती मध्ये फार मोठा गोंधळ निर्माण झाला असल्याने आरोग्य मंत्री यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर, प्रामाणिकपणावर , ईमानदारिवर, सज्जनता , राष्ट्रप्रेम, सामाजिक व विकास योजना आणि कार्यावर फार मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत, असेच प्रकार नाशिकच्या विद्यार्थी सोबत झाले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या होऊ घातलेल्या परीक्षांचे नंबर उत्तर प्रदेश मधिल नोएडा सेक्टर येथे देण्यात आले आहे. राज्यातील आरोग्य मंत्री हे नेहमीच टोपी देण्याचा उपक्रम राबवून मागिल 15 वर्षापासून सतत सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. या परिक्षेच्या निमित्त्याने निर्माण झालेल्या चुका आणि घोटाळे यासाठी आरोग्य मंत्री यांच्यासह आरोग्य सेवा संचालक कार्यालयात काम करणारे वरिष्ठ अधिकारी, राजकीय नेते जबाबदार आहेत हे स्पष्ट होत आहे. यापुर्वी सुध्दा मोठे घोटाळे होणार होते. परंतु गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आल्याचे आणि काही दलालांना बडतर्फ केले असल्याचे वृत्त सर्व स्तरावर प्रसारित झाल्यावर लुटमार करण्याचें काम थांबविले..
आरोग्य विभागाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे समायोजन करणारा अरुण खरमाळे आता मेला तरी कुठे❓. दलाल अजूनही काही प्रमाणात आपले धंदा सुरू केले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील त्या…. एका बाईला नेहमीच सोबत घेऊन असणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या राजकारणी नेत्याच्या आशिर्वादाने पुन्हा एकदा घोटाळा करण्यास सुरुवात झाली असल्याचे चर्चिले जात आहे.
आरोग्य विभागाच्या अखत्यारीत पदे भरण्यात येणार असले तरी फार मोठे घोटाळा होत आहे. या करिता गडचिरोली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील अन्य काही ठिकाणी कार्यकर्ते पासून राज्यकर्ते पर्यंत दलालांच्या श्रृंखला कार्यान्वित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.