काँग्रेसकडून महानगरपालिका सभागृहात तृतीयपंथी सदस्य पाठवू…खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांच्या हस्ते तृतीय पंथीयांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश

469

चंद्रपूर : काँग्रेस ने सत्तर वर्षात तुम्हाला काय दिलं?? हा प्रश्न विचारून तुम्हाला काँग्रेस पक्षापासून तोडण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस ने अल्पसंख्याक समाजाला नेहमी न्याय दिला राष्ट्रपती पासून तर पंतप्रधान पर्यँत अनेक मानसन्मान दिले. जेव्हा विद्यमान केंद्र सरकारने एन आर सी, सी ए ए सारखे कायदे केले, त्यावेळी देखील काँग्रेस पक्षानेच अल्पसंख्याक बांधवांसाठी या कायद्याचा विरोध केला. अलीकडे हैदराबाद मधून कारभार हकणारी पार्टी स्वतःला मुस्लिम समाजाचे हितचिंतक सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, पण भाजप ला हरवायचे असेल तर केवळ काँग्रेस ला साथ देणे आवश्यक आहे. कारण ही वकिलाची पार्टी देखील भाजप ची ‘बी’ टीम आहे. असा घणाघाती हल्ला खासदार बाळू धानोरकर यांनी रघुनंदन लाॅन येथे आयोजित अल्पसंख्याक विभागातर्फे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा यांनी आयोजित केलेल्या मेळावा येथे केला.

अल्पसंख्याक सेल कडून आयोजित या मेळाव्यात काही तृतीय पंथीयांना देखील अल्पसंख्याक सेल च्या कार्यकारणीत स्थान देण्यात आले. त्याचे अभिनंदन करून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत तृतीय पंथीयांना प्रतिनिधित्व देणार असून काँग्रेस पक्षाची नगरसेवक म्हणून तृतीय पंथीय समुदाय महानगरपालिकेत जाणारच असे आश्वासन देखील खासदार बाळू धानोरकर यांनी यावेळी तृतीय पंथीय समाजाला दिले. अल्पसंख्याक समाजाचे मूल आय.एस. आय.पी.स बनले पाहिजे यासाठी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी अध्ययन केंद्राची आणि प्रशिक्षण ऍकॅडमी साठी मी प्रयत्न करणार असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेसचे जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग शहबाज सिद्दिकी, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, महिला काँग्रेस प्रदेश महासचिव नम्रता ठेमस्कार, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, सेवादल चे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खणके, मनपाचे गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, सेवादल चे महिला जिलाध्यक्ष स्वाति त्रिवेदी अल्पसंख्याक चे शहर अध्यक्ष सुलेमान, रमजान घायल, प्रदेश सचिव विजय नळे, युवक इंटक ज़िलाध्यक्ष प्रश्न भारती,अशोक मत्ते, शिवा राव, युवक काँग्रेस चे अध्यक्ष हरीश कोत्तावार, युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव सचिन कत्याल, विधानसभा अध्यक्ष राजेश अद्दूर, डॉक्टर विश्वास झाडे, ओबीसी नेते उमाकांत धांडे यांची उपस्थिती होती.

यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, समाजाच्या तृतीयपंथी कडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्यांना रोजगाराचे पुरेसे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये कौशल्य असूनही तृतीयपंथीय जगण्यासाठी रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात लोकांना आर्थिक मदत मागत असतात. अनेकांकडून त्यांना हिन दर्जाची वागणूक दिली जाते. त्यामुळे त्यांना समाजात स्थान मिळवूण देण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक स्त्रोत वाढावे, नोकरभरतीत त्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी पोलीस विभाग व इतर विभागात दोन टक्के आरक्षण देवून शासकीय नोकरीत सहभागी करावे हि मागणी मी लावून धरली आहे. तृतीय पंथी समाजाला न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी प्रतिपादन केले.