जागतिक अपंग दिनानिमित्य अपंग कर्मचारी यांची कार्यशाळा

341

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटेनेतर्फे दि ३,डिसेंबर, शुक्रवार रोजी दुपारी १,३०ते ५ वाजेपर्यंत मधुर म ,सभागृह विदर्भ हिदी साहित्य संमेलन सीताबर्डी येथे जागतिक अपंग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सिध्दार्थ गायकवाड (प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग,नागपूर ) हे असून उद्घाटक योगेश कुंभेजकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे असतील तर विशेष निमतीत्र म्हणून डॉ.संजय जयस्वाल उपसंचालक आरोग्य सेवा, डॉ कमल किशोर फुटाणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, चिंतामण वंजारी, शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद,किशोर भोयर, जिल्हा समाकल्याण अधिकारी हे असतील यावेळी कर्तुत्ववान, सेवानिृत्त सभासद व कोविड योध्याचा सत्कार तसेच बेरोजगार दिव्यांगांना शिलाई मशीन वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजक विलास भोतमागे यांनी सागितले. या कार्यक्रमास अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रममाचा लाभ घ्यावा असे आवाहन संघटने तर्फे करण्यात आले आहे.