नवे शैक्षणिक धोरण गरीब आणि बहुजनांना इंग्रजी शिक्षणापासून वंचित ठेवणारं – संभाजी ढगे नवीन शिक्षण धोरण विरोधात सम्यक विध्यार्थी आंदोलनातर्फे शिक्षण हक्क परिषदेचे आयोजन…

280

जिवती : नवीन शैक्षणिक धोरणात सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना कोणतीही सवलत देता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे. क्लस्टर पद्धतीमुळे कमी पटाच्या, डोंगर-दऱ्यांमधील गावातील व दुर्गम भागातील शाळा बंद होणार. अर्थात गरीब आणि बहुजनांना इंग्रजी शिक्षणापासून वंचित ठेवणारं हे नवे शैक्षणिक धोरण आहे असे प्रतिपादन संभाजी ढगे यांनी केले. ते येल्लापूर येथे सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या वतीने आयोजित शिक्षण हक्क परिषदेत बोलत होते व त्यांनी शिक्षण व्यवस्था व बेसुमार वाढलेल्या कॉलेज व शाळांच्या फी वर सवाल उपस्थित केले .
शिक्षण हक्क परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना धीरज तेलंग, जिल्हा अध्यक्ष, सम्यक विध्यार्थी आंदोलन, चंद्रपूर यांनी विध्यार्थ्यांच्या अनेक समस्यांवरून सरकारवर निशाणा साधला. विध्यार्थाना तुटपुंजी स्कॉलरशिप देऊन ते हि दोन दोन वर्ष लांबणीवर घालून सरकार विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे असे मत मांडत .
जर ह्या समस्येवर उपाययोजना करून घ्यायची असेल तर पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्याप्रमाणे आंदोलन तीव्र करून नवीन शिक्षण पॉलीसिचा विरोध विद्यार्थ्यांनी संघटितपणे करावा असे विचार मांडले व स्कॉलरशिपच्या प्रश्नासाठी सम्यक तर्फे आचारसंहितेनंतर जिवतीत आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
तर सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे तालुका अध्यक्ष प्रकाश जोंधळे यांनी सम्यकची जिवती तालूक्यातील सम्यक च्या पुढील वाटचालीसंधार्बत मार्गदर्शन करून जिवती तालुक्यातील सम्यकची टीम नेहमी विध्यार्थ्यांच्या विविध प्रश्नावर त्याच्या मागे ठाम पणे उभी राहील व विध्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा पर्यंत करेल असे आश्वासन दिले.
शिक्षण हक्क परिषदेचे सूत्रसंचालन शुद्धोधन निखाडे यांनी केले तर आभार प्रेमकांत कांबळे मानले. शिक्षण हक्क परिषदेच्या यशस्वीतेसाठी शुद्धोधन बनसोडे, प्रेमकांत कांबळे, दशरत गायकवाड, राजकुमार वाघवसे, प्रवीण कांबळे, शुद्धोधन चंदनखेडे, प्रफुल कांबळे, प्रशिक कांबळे, सम्यक जीवने इत्यादीनी अथक परिश्रम घेतले.
शिक्षण हक्क परिषदेचेला येल्लापूर व परिसरातील गावातील पालकांनी व शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला व रात्री संभाजी ढगे यांच्या गायनाचा कार्यक्रम सम्यक विध्यार्थी आंदोलनाच्या नियोजनातून घडवून आणला.