– गौरव लुटे (आरमोरी तालुका प्रतिनिधी)
आरमोरी: गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे . त्यात ओमाॅयक्रोन उत्परिवर्तनाचेही रुग्ण आहेत . या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील शाळा बंद करण्याचे निर्णय घेतला. त्या नुसार 15 फेब्रुआरीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अध्यापनाचे निर्देश देण्यात आले.मात्र ग्रामीण भागात अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला नाही .
सरसकट शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण हे ग्रामीण भागातील डोकेदुखी ठरत आहे. नेटवर्क प्रॉब्लेम स्मार्ट फोने ची कमतरता …अश्या प्रकारच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे
तरी आपणनास विनंती आहे कि आपण स्थानिक पातळीवर तहसीलदार , तालुका आरोग्य अधिकारी , गटशिक्षण अधिकारी यांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत यांच्याशी चर्चा करून शाळां सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुभा दिली पाहिजे आणि ग्रामीण भागातील शाळा बंद करण्याचा निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार घेण्याचे निर्देश द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी तहसीलदार यांना
निवेदन देताना गोकुल खरवाडे , अंकुश गाढवे , प्रीतम धोडणे , अंशुल गाढवे , पाशा शेख , उत्कर्ष ठाकरे आदी उपस्थित होते .