दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी आता महाशरद पोर्टल कायान्वित

216

-दिनेश मंडपे (नागपूर जिल्हा प्रतिनिधी)

नागपूर  : राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाने महाशरद पोर्टल सुरु केले आहे. दानशूर लोकांना दिव्यांगांना मदत देण्यासाठी थेट संबंधित दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहचण्यासोबतच या माध्यमातून दिव्यांगाची नोंदणी करणे या उद्देश्याने पोर्टल सुरु केले आहे.

पोर्टलमध्ये विविध भागातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सहजरित्या नोंदणी करता येणार आहे. पोर्टलवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि महाराष्ट्र राज्य दिव्यांग महामंडळाकडून दिव्यांगासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती या पोर्टलवर देण्यात येणार आहे.
दिव्यांग व्यक्ती, अशासकीय संघटना, समाजसेवक व दानशूर यांनी थेट दिव्यांग बांधवास आर्थिक मदत व त्यांना आवश्यक असणारे सहाय्यक उपकरणे दिव्यांगांपर्यंत पोहचविण्यासाठी महाशरद पोर्टल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पोर्टलवर राज्यातील विविध भागातून दिव्यांग व्यक्ती नोंदणी करीत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी गुगल पेजवरुन http://maharasharadportal असे टाईप करुन पुढे गेल्यास दिव्यांग व्यक्तीस नोंदणी करण्याबाबतची संपूर्ण माहिती मिळेल.

जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी महाशरद पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांनी केले आहे.