वडगांव प्रभागातील अस्वलीचा बंदोबस्त करण्यासाठी काँग्रेसकडून निवेदन…

381

चंद्रपूर: शहरातील वडगांव प्रभागात मागील काही दिवसा पासून रात्रीच्या सुमारास अस्वलीचा वावर दिसुन येत असल्यामुळे तेथील नागरीकांना तिच्या पासून धोका होण्याची शक्यता आहे. आता पर्यंत दोन ते तीन वेळा पहाटे व रात्रीच्या वेळेस फिरणाऱ्या नागरीकाचा अस्वली सोबत आमना-सामना झालेला आहे. अस्वलीमुळे नागरीकांच्या मनात घबराट निर्माण झालेली आहे. तसेच संपुर्ण प्रभागात अस्वलीची दहशत निर्माण झाली आहे।

भीतीमुळे नागरिकांनी स्वतःच्या घराबाहेर निघणे बंद केले आहे. तरी याची दखल घेऊन पुढील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी अस्वलीचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा . तसेच अस्वल शहरात पुन्हा येणार नाही अश्या स्वरुपाच्या उपाय योजना वनविभागाणी त्वरीत कराव्या. अन्यथा वन विभाग कार्यालयासमोर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा अध्यक्ष ताज कुरेशी पर्यावरण विभाग चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटी यांनी सदर निवेदनातुन मुख्य वनसंरक्षक वनवृत्त एन. आर. प्रविण चंद्रपुर व वनपरिक्षेत्र अधिकारी आर.ए. कारेकर याना निवेदन दिले. यावेळी वडगाव परिसरातील नागरिक अल्ताफ़ शेख, अरूण अरणाकोन्डा, जुनेद शेख, अखीलेश जनबन्धु व अन्य कांग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते…