छत्रपती शिवाजी महाराज जयंती प्रित्यर्थ कार्यक्रमाचे बक्षीस वितरण पार पडले.

320

चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ऊर्जानगर ग्रामपंचायत क्षेत्रातील १५ वर्षा आतील बालमित्रांसाठी ऑनलाईन वेशभूषा स्पर्धा आणि किल्ला बांधणी स्पर्धा ग्रामपंचायत सदस्य अनुकूल खन्नाडे यांनी आयोजित केली होती.

किल्ला बांधणी या स्पर्धेमध्ये..
F – 81 येथील शिव गर्जना या ग्रुप ने प्रथम क्रमांक पटकाविला या ग्रुप मध्ये रुद्राक्ष पांडे, रिशिका पांडे, वेदांती वाकडे, स्वरा वाकडे, पूजा वराटे, अभिषेक वराटे होते.तर

E -13, 14 येथील स्वराज्य या ग्रुप ने दृतीय क्रमांक पटकाविला या ग्रुप मध्ये सिया काशिवार, एंजल चव्हाण, आशुतोष इंगळे, माही दुपारे, यथार्थ तावाडे, जानव्ही वाळवे होते..

ऑनलाईन वेशभूषा स्पर्धेमध्ये….
प्रथम क्रमांक – स्वरा मनोज अडगुलवार,
द्वितीय क्रमांक – वीर राजेश पॉल,
तृतीय क्रमांक – स्वरा विशाल इंगळे यांना मिळाला.

या दोन्ही स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांनी क्रमांक पटकाविला त्यांना आकर्षण बक्षीस देण्यात आले. तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात आले.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण माननीय. श्री. नितीनभाऊ भटारकर (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस,चंद्रपूर) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीमती. प्रतिभाताई खन्नाडे (माजी.सरपंच ग्रामपंचायत ऊर्जानगर) , श्री.पंकजभाऊ ढेंगारे (पंचायत समिती सदस्य, चंद्रपूर) , श्री. जगदीश परडखे साहेब, श्री. सचिन भाऊ पाटिल, श्री. मंगेश भाऊ शेरेकर उपस्थित होते..