फक्त पाच व्यक्तीच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला परवानगी नाकारली ?? सुरजागड चा मुद्दा पुन्हा चर्चेत

285

चक्रधर मेश्राम

गडचिरोली   : -सुरजागडसह गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण लोह खाणी /खदानी कायम स्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांच्या नेतृत्वात आज दि.3 मार्च 2022 पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर करण्यात येणाऱ्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला गडचिरोली तहसीलदारांनी परवानगी नाकारल्याने सुरजागड लोह खाणीचा मुद्दा पुन्हा एकदा ज खुपच जोरात चर्चेत आलेला आहे.

सदर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, भाई शामसुंदर उराडे,देवेंद्र चिमणकर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले असता पोलिसांनी त्यांना विनाकारण , कोणत्याही प्रकारची सहनिशा न करता ताब्यात घेतले असल्याचे विश्वसनिय वृत्त हाती आले आहे.. दरम्यान गडचिरोलीचे तहसीलदार यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला कोविडच्या कारणाने परवानगी नाकारली. मात्र बेमुद्दत ठिय्या आंदोलनात फक्त पाचच व्यक्ती सहभागी झालै होते हे महत्वाचे. सदर परवानगी मिळण्यासाठी भाई देवेंद्र चिमणकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील अर्ज दाखल केलेले आहे.
जिल्हाभरात विविध राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जात असतांना कोविडचे हास्यास्पद कारण देवून आंदोलनाला परवानगी नाकारल्याची बाब पक्षाचे सरचिटणीस आम.भाई जयंत पाटील सोमवारी सभागृहाच्या लक्षात आणून देणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी दिली आहे. तसेच सदर प्रकार खदान माफियांच्या दबावाखाली येऊन प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याचा आरोप केला असून डाव्या पक्षांसोबत दुजाभाव करीत असल्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा भाई रामदास जराते, जयश्री वेळदा,भाई शामसुंदर उराडे, देवेंद्र चिमनकर यांनी दिला आहे.