धानाचे चुकारे मिळण्याबाबत शेतकऱ्यांची मागणी…

283

– गौरव लुटे आरमोरी तालुका प्रतिनिधी

आरमोरी – यंदाच्या वर्षी खरिप हंगामात दरवर्षीच्या तुलनेत धान पिकाच्या उत्पादनात घट आली. त्यामुळे शेतकऱी वर्गात हवा तितका समाधान दिसला नाही. आधीच पावसाने दगा दिल्याने उत्पादन कमी झाले. मग हाती आलेल्या धानाच्या भरवशावर योग्य भाव मिळून सोबतच बोनस पण मिळावा या हेतूने मोठ्या संख्येने शेतकरी दरवर्षी मार्केटींग फेडरेशन मार्फत चालणाऱ्या महामंडळाला धान देत असतात.

यावर्षी सुद्धा उत्पादन कमी असले तरी बहुसंख्येने शेतकरी वर्गाने धान महामंडळाला दिले.परंतू धान खरेदी बंद पडण्याच्या शेवटच्या टप्प्यात आलेली असताना सुद्धा अजूनही सुरवातीला धान विकणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकारे प्रलंबित आहेत. त्यामुळे आधीच कर्जाच्या खाईत बुडालेल्या शेतकऱ्यांच्या पदरी आता निराशा पडली आहे.

आधीच डोक्यावर बँक चे कर्ज लादले आहेत ते कर्ज फेडण्यासाठी बँकडुन वारंवार नोटीसा पाठवल्या जात आहेत.याच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांचा धानाचे चुकारेचं दिलासा झाला आहे.आता हेच रखडलेल्या प्रलंबित पडलेल्या धानाच्या चुकारऱ्यांचा मार्ग लवकर ऐरणीवर काढून यावर लवकरात तोडगा काढावा अशी माफक अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे.