जिल्हास्तरीय कोरोना योद्धा म्हणून पुरस्कर्ते सारंग जांभुळे यांचा सत्कार .

536

गौरव लुटे (आरमोरी तालुका प्रतिनिधी)

आरमोरी – येथील महात्मा गांधी कॉलेज यांच्या द्वारा राष्ट्रीय सेवा योजना च्या विशेष शिबिर अंतरजी येथे समारोपीय कार्यक्रमात जिल्हास्तरीय कोरोना योद्धा म्हणून पुरस्कर्ते सारंग जांभुळे यांचा सत्कार करण्यात आला. कोविड च्या काळात अनेक सामाजिक उपक्रम राबवत एक सामाजिक बांधिलकी जपली . घरी तयार केलेले मास्क आणि सोबत लाईफबॉय साबण विकत घेऊन त्यांचे गरजूंना मोफत वितरण केले.
लॉकडाऊन मध्ये अनेक शेतकऱ्यांनी फळभाज्या व पालेभाज्या गरजू लोकांना देऊ केल्या. त्या स्वतः शेतकर्‍यांच्या शेतातून प्राप्त करून गरजूपर्यंत मोफत पोचविल्या.

व्हाटस् अॅप च्या मदतीने रुग्णांना आॅक्सिजन बेड व व्हेंटिलेटर मिळण्यासाठी मदत केली. ब्रम्हपुरी येथील माध्यमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिकेला कोरोना संक्रमण झाल्याने गंभीर अवस्थेत होशंगाबाद, भोपाल, मध्यप्रदेश येथे होत्या त्यांना रेमडिसीवीर इंजेक्शन्स उपलब्ध करून दिले व आपल्या माजी शिक्षिकेचे प्राण वाचवण्यात मौलिक भूमिका बजावली. शिवकालीन पिंड जवळील जागा अतिशय घाण असता दिसतात स्वछ करून तिथे स्वच्छता चा फलक लावला .

कोरोना आजार आणि लसीकरण यांच्याबाबत जनजागृती करण्यासाठी व्हिडिओ तयार करून व्हाटस् अॅप च्या माध्यमातून अनेकांना पाठविला. महाराष्ट्र शासन, युनिसेफ, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या कडून प्राप्त होणारी माहिती, पोस्टर्स आणि व्हिडिओ स्थानिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले.
रासेयो , युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभाग, कर्नाटक सरकार आणि येणेपोया ( डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी ) यांच्या संयुक्त विद्यमानाणे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या यंग वॉरिअर चा फायनल लिस्ट आणि अवॉर्ड चा विषय होता your contribution in society during covid 19 times. .तसेच अनेक रक्तदान शिबीर , झाडे लावणी , दवाखान्यात फळे वाटप , भोजनदान अश्या अनेक प्रकारचे उपक्रमाचा समावेश आहे . आरमोरी ची एक चालती फिरती मदत केंद्र म्हणून ओळखणारे सारंग जांभुळे यांना उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री मा . ना . उदय जी सामंत यांच्या हस्ते नागपूर येथे रासेयो जिल्हास्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आलेला होता .

त्याच अनुषंगाने महात्मा गांधी कॉलेज च्या राष्ट्रीय सेवा योजने च्या विशेष शिबीर च्या समारोपीय कार्यक्रम च्या दिवशी सत्कार करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ लालसिंग खालसा , विशेष अतिथी म्हणून आरमोरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे हे होते .