दिव्यांग खेळाडूंचे क्रिकेट व व्हीलचेअर क्रिकेट चे विभागीय क्रीडा संकुल नागपूर येथे सराव शिबिराचे भव्य आयोजन

298

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर :- समर्थ मिलिट्री अकॅडमि शेगाव, महाराष्ट्र क्रिकेट असो. फॉर डिसेंबल्ड आणि विदर्भ क्रिकेट असो. फॉर डिसेंबल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग खेळाडूंसाठी भव्य क्रिकेट सराव शिबीर विभागीय क्रीडा संकुल मानकापूर, कोराडी रोड नागपूर. येथे दिनांक 2-3 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
या सराव शिबिरात महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट संघ व विदर्भातील दिव्यांग क्रिकेट खेळाडूंना सहभागी होता येईल ….
या विदर्भ स्तरीय दिव्यांग क्रिकेट सराव शिबिरामधून निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र/विदर्भ व्हीलचेअर क्रिकेट संघात व विदर्भ दिव्यांग क्रिकेट संघात खेळण्याची संधी मिळेल…

महाराष्ट्र क्रिकेट असो फॉर डिसेंबल्ड चे अध्यक्ष उत्तमजी मिश्रा, विजय मुनीश्वर, नामदेवराव बलगर (दादा), समर्थ मिलिट्री अकॅडमि चे संचालक पुरुषोत्तमजी बिलेवार, विदर्भ क्रिकेट असो. फॉर डिसेंबल्ड चे अध्यक्ष गिरीश नागभीडकर, नूतनजी उमरेडकर, संजय भोस्कर, दिनेश यादव, धनंजय उपासणी, राहुल लेकुरवाळे, गुरूदास राऊत, विनय यादव, अनिल कोटांगळे, सचिन ठोंबरे, शैलेश वासनिक, अनिल सावंत, मिलिंद घोरमाडे, हाफिज अन्सारी, अजय भुते,मतीन बेग, यशवंत वाघ आणि सचिन पाखरे यांच्या अथक परिश्रमामुळे हे दिव्यांग खेळाडूंचे भव्य सराव शिबीर पार पडत आहे.
विदर्भातील नवीन खेळाडूंना सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा.
1) हाफिज अन्सारी -7066259632 (व्हीलचेअर क्रिकेट)
2) मतीन बेग – 7020698729
3) सचिन पाखरे- 8275340467