प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पात्र घरकुल लाभार्थ्यांचे शेवटचा हप्ता त्वरित द्यावे अन्यथा जनआंदोलन करू ; जितेश कुळमेथे यांचा इशारा

425

चंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पात्र घरकुल लाभार्थ्यांचे शेवटचा हप्ता त्वरित द्यावे, या मागणीचे निवेदन यंग चांदा ब्रिगेड, चंद्रपूर मार्फत मनपा आयुक्त राजेश मोहिते निवेदन देण्यात आले. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष जितेंद्र कुलमेथे यांनी दिला आहे.

सन 2017- 18,2018- 19,2019-20 ह्या तिन्ही आर्थिक वर्षात चंद्रपूर शहरातील घरकुल मंजूर करण्यात आले आहे.शिवाय मनपा मार्फत ज्यांना घरकुल मंजूर झाले अश्या लोकांचे घर पाडून नवीन घर बांधकामाचे आदेश देण्यात आले.
लाभार्थ्यांचे घर बांधकाम सुरू झाले आज ते बांधकाम निम्याहून अधिक बांधकाम होउन देखील उर्वरित निधी मनपा मार्फत न मिळाल्यामुळे आज लाभार्थ्यांना किरायाची रूम करून राहावे लागत आहे.त्यामुळे लाभार्थ्यांचे मानसिक,आर्थिक,शारीरिक हनन होत आहे याला मनपा पालिकेचे शासन प्रशासन जबाबदार आहे

मागील तिन्ही वर्षापासून ज्या लाभार्थ्यांना घरकुलाचे शेवटचे हप्ते मिळाले नाही अश्या सर्व लोकांना त्वरित निधी देण्यात यावे अन्यथा मनपा विरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा जितेद्र कुळ मे थे यांनी दिला आहे.