माराईपाटन येथे शाळापूर्व तयारी बालक-पालक मेळावा थाटात साजरा

366

बळीराम काळे/जिवती,

जिवती : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माराईपाटण येथे शाळापूर्व तयारी बालक पालक यांचा मेळावा अत्यंत थाटात साजरा करण्यात आला. यात प्रामुख्याने सकाळी शाळा व्यवस्थापन समिती यांच्या उपस्थित प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले प्रभात फेरीत शैक्षणिक घोषवाक्य म्हणण्यात आली. यानंतर वर्गखोलीत लावलेल्या टॉल्सचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष विलास करपते व उपाध्यक्ष प्रदीप काळे यांचे हस्ते करण्यात आले.
प्रत्येक बालकाची व पालकांची नोंद घेऊन प्रत्येक स्टॉलवर त्यांच्याकडून कृती करून घेण्यात आल्या, यात बालकांनी खूप आनंदात सहभाग घेतला प्रत्येक बालकांची वजन व उंची घेण्यात आली, त्याचप्रमाणे पालक मार्गदर्शिका तसेच विद्यार्थी कृतीपत्रिका यांचे वाटप करण्यात आले या मेळाव्यात पालक काळे यांचेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा शाळेला भेट म्हणून देण्यात आली सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विजय
आकनूरवार,शिक्षक, बानकर सर, जरीले सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विद्यार्थी व पालकांनी मेहनत घेतली