टायगर ग्रुपच्या मध्यस्थीने त्या २१ मजुरांना मिळाली हक्काची मजुरी…

1034

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

चामोर्शी तालुक्यातील सोनापूर गावातील २१ मजूर हे तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी तेलंगाणा राज्यात गेले होते. तेंदूपत्ता संकलन संपल्यावर त्यांना कंत्राटदाराने करारनाम्याप्रमाणे मजुरी द्यायला पाहिजे होती परंतु त्यांना मजुरी न देताच आलापल्ली येथे सोडून दिले.

त्या मजुरांनी टायगर ग्रुपच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करून आपली व्यथा सांगितली. त्यावर टायगर ग्रुप च्या पदाधिकाऱ्यांनी तेथील G.M ला कॉल करून याबाबत विचारणा केली व लगेच पेमेंट करण्यास सांगितले.

टायगर ग्रुपच्या पदाधिकारी यांच्या सांगण्यावरून G.M यांनी त्यांच्या सहकार्याला पाठवून अगदी २ तासात सर्व मजुरांचे मिळून १,९३, ८८४/- रुपये टायगर ग्रुपच्या जनसंपर्क कार्यालयात आणून दिले व टायगर ग्रुप च्या पदाधिकाऱ्यांनी त्या २१ मजुरांचे पेमेंट केले. यावेळी आज टायगर ग्रुप चे अध्यक्ष दौलतभाऊ रामटेके, सचिव आदर्शभाऊ केशनवार, कोषाध्यक्ष सागर रामगोनवार, रक्तसेवक कुणाल वर्धलवार यांच्या मध्यस्थीने त्या २१ मजुरांना त्यांची हक्काची मजुरी मिळाली..