प्रलय म्हशाखेत्री व मित्र परिवारातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा…छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण व मिठाई वाटप…

348

चंद्रपुर: स्थानिक राजनगर कॉलनी,चंद्रपूर येथे प्रलय म्हशाखेत्री आणि मित्र परिवारातर्फे आज मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्या दिवशी पासून हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. म्हणूनच हा दिन एक उत्सव म्हणून युवा वक्ते प्रलय म्हशाखेत्री व त्यांच्या मित्र परिवाराने साजरा केला..

यावेळी प्रलय म्हशाखेत्री, श्याम म्हशाखेत्री, हर्षल येलमुले, पवन येलमुले, प्रीत म्हशाखेत्री, क्रिश तिवाडे, हृषीकेश, अमित, साहिल आणि बराच मित्रपरिवार उपस्थित होता.