राजूरा प्रतिनिधि :- राकेश कडुकर
राजुरा :-रेती पुरविणार्या व्यवसाईकाकडून 25 हजार रूपयाची मागणी करणार तलाठ्याला पैसे स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले आहे.ही कार्यवाही राजूरा तालुक्यातील वरूर येथे करण्यात आली.विनोद गेडाम असे लाच स्विकारणार्या तलाठ्याचे नाव आहे.या कार्यवाहीने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराचा रेतीचा पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे.रेती पुरवठा करणारा ट्रक तलाठी विनोद गेडाम यांनी पकडला.ट्रक सोडविण्यासाठी तलाठी गेडाम यांनी पंचवीस हजार रूपयाची मागणी केली.मात्र तक्रारदाराला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली.लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली.लाच लुचपत विभागाचा अधिकार्यांनी सापडा रचून तलाठ्याला पैसे घेतांना रंगेहात पकडले.ही कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक अविनाश भामरे,नरेश नन्नावरे,रोशन चांदेकर,रविढें,संदेश वाघमारे,मेघा मोहूर्ले,सतिश सिडाम यांनी केली.या कार्यवाहीने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.