गोंडपिपरी तालुक्यात बुडीत क्षेत्राचे सर्व्हे सुरू…

913

शरद कुकुडकार
भंगाराम तळोधी प्रतिनिधी

गोंडपिपरी: वर्धा नदीला पूर आल्याने नदी काठावरील शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अडेगाव, दरूर, सुपगांव, नंदवर्धन, शिवणी ,पानोरा यासह विविध गावातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीत पुराचे पाणी शिरले.

पूराच्या पाण्याने लागवड केलेले सोयाबीन, कापूस, मिरची, तूर, धान यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज दि.20 जुलै रोज बुधवारला तालुका कृषी विभागाच्या वतीने बुडित क्षेत्राची सर्व्हे सुरू करण्यात आले आहे.

गोंडपीपरी तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनात कृषी सहायक पेंदोर यांनी शेतकार्याच्या शेत शिवरात जाऊन सर्व्हे करीत आहेत. यावेळी अडेगावच्या सरपंच रेखाताई,चौधरी, उपसरपंच विजय चौधरी, अशोक कोवे, नरेश झाडे कृषी मित्र भगीरथ नागापूरे महेश ठाकूर, विलास नागापूरे,चंपत ठाकूर, यासह गावतील शेतकरी उपस्थित होते…