नक्षल सप्ताहाचा परिसरात कोणतीच भीती नाही… प्रभारी पोलीस अधिकारी शिंब्रे यांचे आव्हान

888

ब्युरोचीफ प्रशांत शाहा
चामोर्शी: गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात येत असलेल्या अति दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणारा घोट, रेगडी या परिसरात २८ जुलै हा दिवस दहशतीचा असायचा.
परंतु जिल्हा पोलिस विभागातर्फे घोट नंतर रेगडी व कोटमी या गावात पोलीस मदत केंद्र उभारल्याने मागील दोन ते तीन वर्षात या परिसरात नक्सल बंद दरम्यान कोणतेच वाईट कृत्य आढळून येत नसल्याचे चित्र आहे. या दोन्ही पोलीस मदत केंद्रातील जवान रात दिवस अभियान राबवत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात २८ जुलै हा नक्सल सप्ताह म्हणून पाळल्या जात असतो. सध्या पोलीस अधीक्षक कार्यालयातून अनेक उपयोजना राबवून व गावोगावी बॅनर व पोस्टर लावून आदिवासी नागरिकांना जागृत करण्याचे मोहीम जिल्हा पोलिसानी हाती घेतले आहे. याचाच एक उदाहरण रेगडी येथे पाहण्यास मिळाला.

रेगडी येथील प्रभारी पोलीस अधिकारी श्री,नंदकुमार शिंब्रे यांनी रेगडी परिसरात अनेक ठिकाणी बॅनर व पोस्टर लावल्याचे चित्र दिसत आहे.