शेणगाव येथे निःशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शत्रक्रिया शिबीर संपन्न… सदर शिबिरात ७७ रुग्णांची केली तपासणी

548

बळीराम काळे/जिवती

जिवती (ता.प्र.) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी वेगवगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जिवती तालुक्या अंतर्गत शेणगाव येथे निवनच प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले असून,याच पार्श्वभूमीवर आचार्य विनोबा भावे सावंगी (मेघे) वर्धा, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण व शेणगाव यांच्या सहकार्याने, समता फाउंडेशन द्वारा निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र, शेणगाव येथे पार पडले.
सदर शिबिरात एकूण ७७ नागरिकांनी तपासणी करिता सहभाग घेतला असून तपासणी अखेर शस्त्रक्रियेकरिता २१ रुग्णांना २९ ऑगष्ट रोजी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) वर्धा / जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे मोफत शस्त्रक्रिये साठी पाठविण्यात येणार आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची जाणे येणे प्रवास, राहण्याची व जेवणाची मोफत सोय होणार आहे.

शिबिराच्या यशस्वीतेकरिता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे यांचे मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले तसेच डॉ.आबीद शेख, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव, डॉ.कविता शर्मा, वैद्यकीय अधिकारी, प्रा.आरोग्य केंद्र पाटण, डॉ. छाया शेडमाके, वैद्यकीय अधिकारी, प्रा.आरोग्य केंद्र पाटण, आरोग्यदूत स्वयंसेवक, गोविंद गोरे, आशा सेविका, पाटण, शेणगाव आरोग्य केंद्रातील कर्मचारीवृंद व मानव विकास, हेल्थ एज इंडिया यांचे मोलाचे सहकार्य लाभले.