मकरंद अनासपुरे यांच्या सिनेमाची पुनरावृत्ती ईरई नदी चोरीला गेली…

1219

श्याम म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक)

चंद्रपुर: सविस्तर वृत्त असे इंडिया दस्तक न्यूज टीव्हीचे जिल्हा संपादक यांनी मोका चौकशी केली असता इरई नदीमध्ये वेकोलीच्या मातीचे ढिगारे आहे की मातीच्या ढीगामध्ये इरई नदी आहे हे कळलेच नाही. संपूर्ण नदीचे पाणी ह्या ढिगारा मुळे बाहेर फेकल्या जाते आणि त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. इरई नदीला वारंवार पूर येऊन रहमत नगर, सिस्टर कॉलनी, विठ्ठल मंदिर वॉर्ड, राजनगर, सहारा पार्क या लोक वस्तीला पुराचा तडाखा कायम बसण्याचे कारण माना टेकडी जवळ व आरवट गावाला लागून वेकोलीचे मोठ मोठे मातीचे ढिगारे नदी मध्येच टाकण्याचे काम केले आहे आणि या सर्व प्रकाराला वेकोलिचे अधिकारी जिम्मेदार आहे.

या साऱ्या गोष्टीकडे लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची गरज आहे. एकीकडे महानगर पालिका यांनी आदेश काढला आहे की नदी जवळील लोक वस्तीला आम्ही जिम्मेदार नाही. परंतु ह्या सर्व प्रकाराला कोण कोण अधिकारी जिम्मेदार आहे हे मोक्यावर जावून बघणे आवश्यक आहे. आज घडीला नदीचे पात्र पूर्णपणे वेकोलीच्या चुकीच्या मार्गाने बुजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे आरवट ग्रामपंचायत यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

कारण अगदी नदीलगत गाव आणि गावालगत मातीचे वेकोलीचे ढिगारे टाकण्याकरिता ग्रामपंचायतने एन ओ सी दिली आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. सोबतच स्थानिक लोक प्रतिनिधींनी या संपूर्ण घडामोडींवर लक्ष देवून कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी. सिस्टर कॉलनी, विठ्ठल मंदिर वॉर्ड, रहमेत नगर ,राज नगर,सहारा पार्क येथील लोकांना न्याय मिळवून द्यावे. अन्यथा समाज समता संघाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष इंजि. नरेंद्र डोंगरे, समाज समता संघाचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष महिला रेखाताई रामटेके, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मुन्ना भाऊ तावाडे, महिला जिल्हाध्यक्ष बबीता ताई चालखुरे यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.