दोन वर्षात बार्टीची विद्यार्थ्यांना साथ

821

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा संपादक

नागपूर : एकीकडे कोविडचे संक्रमण अधिक प्रमाणात वाढले असताना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्राने विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणाचा माध्यमातून चांगली साथ दिली. यामुळे अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत. तर काही विद्यार्थी अधिक दर्जेदार शिक्षण घेत आहेत.
दोन वर्षात एमपीएससीचे प्रशिक्षण घेणार्‍या ४०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले. त्याचबरोबर कोविड काळात ऑलाईन प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. विविध संस्थांच्या माध्यमातून पूर्व, मुख्य प्रशिक्षण दिले जात आहे. पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देणारी बार्टी एकमेव संस्था आहे. तर राज्यसेवा, न्यायिक सेवा इतर परीक्षेच्या मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना थेट १० हजार रुपये दिले जाते. याचबरोबर यूपीएससी प्रशिक्षण सुरु करणार्‍यात बार्टी आघाडीवर आहे. आर्थिक सहाय्य योजना, मॉक इंटरव्ह्यूचे आयोजन, यशदा आणि एसआयएसी आणि पीआयटीसी येथे बार्टीतर्फे प्रशिक्षण या दोन वर्षात विद्यार्थ्यांना देण्यात आले. तर बार्टी येरवडा संकुल, पुणे यथे यूपीएससीचे निवासी प्रशिक्षण राबविण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर बार्टीतर्फे १० उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या हिताकरीता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना प्रस्तावितही करण्यात आली आहे. याशिवाय समतादूताच्या माध्यमातून बार्टीतर्फे भारतीय संविधानबाबत जनजागृती, अनूसचित जाती समिती व लोकप्रतिनीधीच्या भेटी, वक्षारोपण कार्यक्रम, स्वय सहायता युवा गट तयार करण्यात आले. शिवाय कर्मचार्‍यांना अधिक दर्जेदार प्रशिक्षण देण्यातही बार्टीतर्फे पुढाकार घेण्यात आला. बार्टीतर्फे परदेशी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून १२ हजार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत लाभ उचलला आहे. त्यांच्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यानही आयोजित केले जाते. तर यू ट्यूब सुरु करणारी बार्टी एकमेव संस्था असून आतापर्यंत जवळपास १ लाख ८३ हजार सबस्क्राईबरही आहेत. महासंचालक डॉ. धम्मज्योती गजभिये यांच्या मागदर्शनामध्ये रहाटे नगर टोली येथील यात मांग गारुडी समाजाचे सवेक्षण करण्यात आले. तरसंशोधनाच्या माध्यमातून भटके गोसावी यांचे सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणही बार्टीने करून शासनाला अहवाल सादर केला आहे. बतर अनु जातीच्या सामाजिक, आर्थिक शैक्षणिक विकासाबाबत १८०५ कुटूंबाचे बेंचमार्क सवेक्षणही बार्टीतर्फे करण्यात आले आहे. तर हिंदू खाटिक समाजाचा सुधारित अहवालही राज्य शासनास सादर करण्यात आला. संपूर्ण मार्फत बार्टी तर्फे शिक्षित बेरोजगार युवा यांच्याकरिता उद्योजगाच्या विविध संधी उपलब्ध व्हावा यासाठी टेक्निकल व हायटेक मोफत प्रशिक्षणही डॉ. धम्मज्योती गजभिये यांच्या काळात सुरु झाले आहे.