ट्रक चा धडकेत बसचे मोठया प्रमाणात नुकसान..सुरजागड प्रकल्पामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ

767

प्रितम गग्गुरी(अहेरी तालुका प्रतिनिधी)

आलापल्ली :- दिनांक ६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ च्या सुमारास अहेरी आगारातून एटापल्ली मार्गे गडचिरोलीकडे निघालेल्या बस ला ट्रक ने धडक दिल्याने अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी नसलेतरी एसटी महामंडळाच्या बसचे मोठे नुकसान झाले आहे.

अहेरी – एटापल्ली- जारावंडी मार्गे गडचिरोली कडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या (एम एच -४० ए क्यू – ६०९४ ) या बस ला आलापल्ली च्या एटापल्ली रस्त्यावर सुरजागड वरून लोहखनिज घेऊन आष्टीकडे जाणाऱ्या (ओ डी -०९ जी- ०८५५) ट्रकने धडक दिली. बसला धडक देताच बस मधील प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत बाहेर पडले. सुदैवाने जीवितहानी नसलेतरी एसटी बसचे नुकसान झाले.सुरजागड प्रकल्प चालू झाल्यापासून बरेच अपघात झाले आहे.

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. या घटनेची माहिती अहेरीचे उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बोण्डसे यांना कळताच घटनास्थळी येऊन  पाहणी केली. सध्या एटापल्ली-आलापल्ली आष्टी या मुख्य मार्गावर अपघात, वाहतूक कोंडी होणे हे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

प्रशासनाने यावर त्वरित यावर तोडगा काढावी नाही तर अपघाताचे प्रमाण पुन्हा-पुन्हा वाढत जाईल. अपघाताचे प्रमाण नाही वाढावी या साठी सात दिवसा अगोदर आलापल्ली येथील व्यापारी संघटनेने प्रशासनाला निवेदन दिले होते. योग्य नियोजन आणि नियंत्रण नसल्याने दिवसेंदिवस अश्या घटना घडत असल्याची ओरड सुरू आहे. प्रशासन पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.