ब्रेकिंग न्यूज: इरई नदी पात्रात दहावीत शिकणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू…

855

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपुर)

चंद्रपूर: आरवट गावालगत असलेल्या इरई नदीमध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे की, आरवट गावातील तीन मित्र ओम सचिन किन्नाके, पियूष नंदरकर व स्नेहल मेश्राम दुपारच्या सुमारास पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी इराई नदीवर गेले.

सर्वात प्रथम ओम याने पाण्यात उडी घेतली त्या मागे त्याचे दोन्ही मित्रांनी सुद्धा पाण्यात उडी घेतली. ओम हा परत बाहेर निघून आला आणि परत त्याने एकदा पाण्यात उडी मारली. नदी पात्र खोल असल्यामुळे तो सरळ डोह असलेल्या पाण्यात बुडाला. तिथेच त्याचा मृत्यू झाला.

जीवाच्या आकांताने ओम आरडा ओरड करू लागला. परंतु तिथे उपस्थित काही मच्छिमार लोक पळून गेले असे त्याच्या सोबत असणारा त्याचा मित्र पियूष याने घटनास्थळावर असलेल्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीच्या जिल्हा संपादकाना माहिती दिली.

मयत हा गरीब कुटुंबातील असून त्याच्या आई वडिलांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. ही माहिती चंद्रपुर शहर पोलीस स्टेशन यांना देण्यात आली. पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले असून स्थानिक मच्छीमार यांच्या साहाय्याने शोध सुरू होता. परंतु वृत्त्त लिहीतपर्यंत मृतकाचे शव मिळाले नाही.