शिक्षक रुजू न झाल्यास शाळा बंद करण्याचा शाळा व्यवस्थापन समितीसह गावकऱ्यांचा पत्रकातुन इशारा

927

 

शरद कुकुडकार
गोडपिपरी ग्रामीण प्रतिनिधी

गोंडपीपरी पंचायत समिती अंतर्गत,वेडगाव केंद्रात टोले नांदगाव येथील जिल्ह्या परिषद शाळा आहे.या शाळेतिल
शिक्षक संतोष उईके यांची तात्पुरती प्रतीनियुक्ती हिवरा शाळेत करन्यात आली.
त्यामुळे टोले नांदगाव जिल्हा परिषद शाळेतिल विद्यार्थ्यांचे 15 ते 20 दिवसापासून शैक्षणिक नुकसान होतआहे.
त्यामुळे शिक्षक संतोष उईके याची हिवरा शाळेत करन्यात आलेली प्रती नियुक्ती रद्द करून टोले नांदगांव येथील शाळेत परत देण्यात यावी या संदर्भात शाळा व्यवस्थापण समितीचे पदाधिकारीसह ग्रामस्थानी गोंडपीपरीचे संवर्ग विकास अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी यांना तेथील शाळा व्यवस्थापण समिती सह गावकऱ्यांनी सह्यानिशी विनंती अर्ज दिला.
यामध्ये उद्या दि.23 सप्टेंबर रोज शुक्रवारला शिक्षक शाळेत रुजू न झाल्यास 24 सप्टेंबर रोजी म्हणजेच शनीवारला शाळा बंद करण्याचा इशारा पत्रकातून देण्यात आला आहे.
याबाबतचे एक प्रत शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भारत येलमुले, राकेश आत्राम,संगीता कुळसंगे,सुधाकर झाडे, साईनाथ येलमुले, नंदु कन्नाके, सचिन आत्राम,यासह शाळा व्यवस्थापण समितीचे पदाधिकारी ,पालक यासह गावातील ग्रामस्थाच्या सह्या दिलेल्या पत्रकात नमूद आहेत.