भारत जोडो यात्रा नियोजनासाठी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न…. महासचिव मुकुल वासनिक यांची उपस्थिती : नवनिर्वाचीत तालुकाध्यक्षांचा नियुक्तीपत्रे देऊन सत्कार.

609

चंद्रपूर :– जननायक राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा दिनांक 07 ते 20 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातून पुढे जाणार आहे. या भारत जोडो यात्रे संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील सहभाग आणि त्याच्या नियोजनबाबत आज जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूर येथे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महासचिव मा. श्री मुकुलजी वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत आढाव बैठक पार पडली. या प्रसांगी काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचीत तालुका अध्यक्षांना (ब्लॉक अध्यक्ष) नियुक्ती पत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी खासदार बाळूभाऊ धानोरकर, भारत जोडो यात्रा जिल्हा समन्वयक तथा आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे, जिल्हाप्रभरी मुजून पठाण, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर, युवक जिल्हाध्यक्ष शांतनू धोटे, शहर अध्यक्ष रामू तिवारी, विनोद दत्तात्रय, डॉ अविनाश वार्जुरकर, विनोद भांगडे, सुभाष गौर, युवक शहर अध्यक्ष राजेश अड्डुर, जिल्हाध्यक्ष सेवादल सूर्यकांत खनके यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.