युवा शेतकऱ्याची यशोगाथा: नोकरीच्या मागे न लागता केले गायपालन… दुग्धव्यवसायातून महिन्याला कमतोय अडीच-तीन लाख रुपये…

448

मुंडेवाडी ता. पंढरपूर येथील आरिफ सय्यद या तरुणाने जर्सी (एचएफ) गाय पालनामध्ये मोठी किमया केली, कारण दुसरीकडे मजुरीला जाणारा हा तरुण आता मालक झाला असून त्याने एचएफ गाय पालनामध्ये एका महिन्याला सुमारे अडीच ते तीन लाखाच्या वर दुग्धव्यवसायातून नफा कमावतो आहे.

आरिफपुढे बीएमधून शिक्षण झाल्यानंतर पोटापाण्याचा प्रश्न समोर होता. असे असतांना त्याने सुरवातीच्या काळात मजुरी केली. मोजमजुरी करून तो संसाराचा गाडा समोर घेऊन जात होता. आधीपासून कोणत्याही कामाची लाज न बाळगता मिळेल ते काम आरिफ करायचा. अशातच त्याने नोकरीही शोधण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु नोकरी मिळाली नाही. त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता २००६ साली आरिफ शेतीकडे वळला.

शेती करत असतांना आरिफने एक गाय विकत घेतली. त्यातून त्याला दररोज १० लिटर दुध मिळायचे. हळूहळू परिसरात दुधाची मागणी वाढत गेली. पुढे आरिफने पुन्हा एक गाय विकत घेण्याचा निर्णय घेतला. दोन गायीच्या दुधापासून त्याला चांगले उत्पन्न मिळायचे आणि आज एका गायी पासून सुरू झालेला प्रवास २०-२५ गायी पर्यत पोहचला आहे.

आज आरिफला या गायीपासून दररोज २०० लिटर दूध प्राप्त होते. यातून आरिफ महिन्याला अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पादन घेतो आहे. आरिफचे हे यश नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.