सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

519

 

नागपूर : महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी व तालुका स्तरावर महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो. नोव्हेंबर-2022 या महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांचे दालनात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे. लोकशाही दिनात दाखल करावयाच्या तक्रारीचा अर्ज हा विहीत नमुन्यात असावा. तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा. तक्रार किंवा निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेला अर्ज, सेवा विषयक किंवा आस्थापना विषयक बाबी, तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसणारे अर्ज महिला लोकशाही दिनाकरिता स्वीकारण्यात येणार नसल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.