राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आंदोलन

270

 

चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे संपूर्ण राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोमवारी, २१ नोव्हेंबरला चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्त्वात राज्यपाल कोश्यारी, प्रवक्ता त्रिवेदी यांच्या प्रतिमेवर शाई फेकत, प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. शहरातील गांधी चौकात आंदोलन पार पडले.
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. भगतसिंग कोश्यारी हे राज्याचे राज्यपाल आहेत. घटनात्मक पदावर असलेल्या कोश्यारी यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले आणि
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील कार्यक्रमात कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमान करणारे विधान केले. असेच विधान भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनीसुद्धा केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र, देशच, नव्हे, तर संपूर्ण जगातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे विकृत मानसीकतेतून वारंवार थोरमहापुरुषांविषयी अपमानजनक वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे या घटनात्मक पदावर राहण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. त्यामुळे त्यांना राज्यपाल पदावरून तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यपाल कोश्यारी, भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेवर शाई फेकली. त्यानंतर राज्यपालांचा धोतर फाडत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, प्रदेश सचिव विजय नळे, ज्येष्ठ नेते के. के. सिंह, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संगीता अमृतकर, अनुसूचित जाती विभागाच्या अश्विनी खोब्रागडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष उमाकांत धांडे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे, महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, अनुसूचित विभागाच्या हर्षा चांदेकर, निषा धोंगडे व पाखी उपरे, माजी नगरसेवक नीलेश खोब्रागडे, एन.एस.यु.आय. चे यश दत्तात्रय, इंटक चे प्रशांत भारती, मनीष तिवारी, युवक काँग्रेसचे कुणाल चहारे, संदीप सिडाम, अजय बल्की, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र दानव, साबीर सिद्दिकी, युसुफ चाचा, दुर्गेश कोडाम, बापू अन्सारी, प्रदीप डे, चंद्रमा यादव, मोनू रामटेके, विनीत डोंगरे, पप्पू सिद्दिकी, वैभव रघाताटे, सुल्तान अश्रफ अली, गौस भाई, माजी नगरसेविका विनाताई खनके, राहुल चौधरी, सौरभ ठोंबरे, माजी नगरसेवक पिंटू शिरवार, शालिनी भगत, माजी नगरसेवक एकता गुरले, माजी नगरसेविका संगीता भोयर, बबिता चालखुरे, राजीव खजांजी, रवी रेड्डी, चंद्रम्मा यादव, नागेश बांडेवार, कादर शेख यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.