ग्रामस्थांनी आरोग्य जोपासावे : खासदार बाळू धानोरकर

185

 

आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्य आरोग्य निदान शिबिराचे उद्घाटन

चंद्रपूर : आयुष्य जगताना आरोग्य फार महत्त्वाचे असते. आरोग्य आणि शरीर याचे महत्त्व कोरोनाचा काळात सर्वांनाच कळले आहे. आरोग्य जर व्यवस्थित नसेल तर भविष्य उज्वल होत नाही. त्यामुळे सर्वांनी आरोग्याची जपणूक करावी असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

आज आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरोरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माढेळी आणि शेगांव येथे सेवा सप्ताह व आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटन प्रसंगी खासदार बाळू धानोरकर बोलत होते.

याप्रसंगी आमदार प्रतिभा धानोरकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, माजी सभापती बाजार समिती वरोरा राजू चिकटे, माजी सभापती बाजार समिती वरोरा विशाल बदखल, माजी सभापती पंचायत समिती वरोरा रवींद्र धोपटे, पुरुषोत्तम पावडे, पंचायत समिती सदस्य डॉ. शालिक झाडे, महादेवराव कोटकर, विजय आत्राम, योगेश खामणकर, डॉ. मिस्त्री, डॉ. मानवटकर मॅडम, हमीष भाई कुरेशी , सरपंच निखिल हिवरकर, चंदू जयस्वाल, सरपंच संजय चिमुरकर, गजानन चांदेकर, भिमाजी वाटकर, प्रफुल असूटकर, मंगेश भलमे, सरपंच पिदूरकर, सरपंच प्रवीण भोयर, सविता ढोंगले, वनिता चंदनखेडे, वंदना येरचे, गोपाल देवतळे, सविता कानफाडे, बोढाले, डॉ. उस्मान, डॉ. प्रतिमा बोपचे, इस्टमल पठाण, निखिल हिवरकर यांची उपस्थिती होती.

माढेळी येथे आशा हॉस्पिटल, नागपूर आणि शेगांव येथे मानवटकर हॉस्पिटल, चंद्र्पुर यांनी आरोग्य शिबिरात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार केला. उद्घाटन प्रसंगी आयोजित आरोग्य शिबिराला परिसरातील ग्रामस्थांनी मोठी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून निदान करून घेतले.