खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य पटकावे…जिल्हाधिकारी संजय मिना यांचे प्रतिपादन..

333

ब्युरोचीफ प्रशांत शाहा

खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य पटकावे, खेळांचे दिवस फक्त तिन दिवस ठेवले आहेत परंतु विद्यार्थांना दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक तास खेळायला दिला पाहीजे त्यातून शरीर सुदृट राहतो बुध्दीचा सुध्दा विकास होतो असे प्रतिपादन महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत घोट येथील अहिल्यादेवी बालगृहात १०ते १२ जानेवारी दरम्यान जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव व क्रीडा स्पर्धेचे आयोजनच्या उद्‌घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी व्यक्त केले या स्पर्धेची उद्घाटन जिल्हाधिकारी संजय विना यांचे हस्ते करण्यात आले.तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गडचिरोलीचे जिल्हा माहीती आधीकारी सचिन अडसुर तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोलीचे बाल कल्यान समीतीच्या अध्यक्षा वर्षा मनवर, घोट ग्रामपंचायतच्या सरपंच रुपाली दुधबावरे, घोट पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी संदीप रोंढे,पोलीस पाटील हरीदास चलाख,आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक गडचिरोलीचे जि .म. बा.वि.अधिकारी प्रकाश बा. भांदककर संचालन निराशा गुरुनुले तर आभार बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे यांनी मानले सदर तिन दिवसीय कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन केले असुन यात कबड्डी स्पर्धा,सांस्कृतीक स्पर्धा,निबंध स्पर्धा , घोषवाक्य स्पर्धा, सामान्य ज्ञान,रांगोळी स्पर्धा तसेच सामुहीक गायन स्पर्धा घेण्यात येणार आहेत.