अक्षय करपे यांच्या हस्ते अनेक कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश…

508

प्रितम म.गग्गुरी(उपसंपादक)

येलचिल :- शिवसेना तालुका प्रमुख अक्षय करपे यांच्या हस्ते येलचिल येथे शिवबंधन बांधून बाळासाहेबांची शिवसेनेत अन्य पक्षाच्या कार्यकत्यांचा जाहीर प्रवेश केले. पार्टी प्रमूख बाळासाहेब यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेऊन अहेरी तालुक्यातील येलचिल गावातील बहु संख्येने शिवसैनिकांनी,बाळासाहेबांची शिवसेना या गटात विविध प्रकारचे कार्यकत्यांनी प्रेवश घेतला आहे .

येलचिल गावात जाऊन लोकांचे समस्या जाणून शिवसेना तालुका प्रमुख अक्षय करपे यांनी बाळासाहेबांच्या विचारावर येलचिल गावात बैठक घेऊन शिवप्रेमी यांना शिवबंधन बांधले. यावेळी दुलीचंद धुर्वे, सोनल पुनघाटे, दिपंकर दास, संजू आत्राम, अक्षय कुलमेथे, नागेश आत्राम, गजानन धुर्वे, बिपीन बैरागी, दुलसा पुनघाटी, ईश्वर मडावी, राकेश धोबे, किशोर मडावी, राहुल उराडे, राजकुमार उईके, शंकर धुर्वे, मधुकर मडावी यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने विचाराने प्रेरित होऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत दररोज पक्ष प्रवेश होत आहे शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संघटन मजबूत होत आहे आगामी निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेला कार्याचा मोठा फायदा होईल असा विश्वास तालुकाप्रमुख अक्षय करपे यांनी व्यक्त केला.