तरुण युवकाची हत्या की आत्महत्या? आमच्या मुलाची आत्महत्या नसून घात-पात झाल्याचा आई – वडिलाचा आरोप

575

जिवती : (ता.प्र.) जिवती तालुक्या अंतर्गत येणाऱ्या टेकामांडवा हद्दीतील गोलेवारगुडा येथील संतोष शिंदे या २४ वर्षीय तरुण मुलाचा जंगलातील कडू लिंबाच्या झाडाला गळफास लावून मृत्यू देह लटकलेल्या अवस्थेत आढळला.ही घटना मंगळवारच्या रात्रीला घडलेली आहे.परंतु संतोष शिंदे यास विनोद हाके यांनी मंगळवारी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान आई,वडील यांना विचारणा करून सोबत घेऊन गेला व तो परत घरी आलाच नाही.म्हणून आई,वडिलांनी पूर्ण गाव शोधा शोध केली.पण मुलाचा शोध लागला नाही. आई, वडील पाहुणे मंडळी यांना विचारणा केली.पण मुलाचा शोध लागला नाही.या विवचानेत असता त्यात कडू लिंबाच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतुदेह गुरुवारी आढळून आला.

मात्र तरुणाची हत्या करण्यात आली आहे. असा आरोप नात्येसंबधित कुटुंबीयांनी करत शवविच्छदनानंतर मृत्यदेह दोन ते तीन तासापर्यंत चौकात ठेऊन सखोल चौकशी करून आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याची मागणी केली.
यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संतोष राजेंद्र शिंदे (२४ रा.गोलेवारगुडा) असे मृत तरुणांचे नाव असून,संतोष शिंदे २८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान बाहेर जाऊन येतो,असे आपल्या आईला दुचाकी स्प्लेंडर दुचाकी घेऊन बाहेर पडला.उशिरापर्यंत आपला मुलगा घरी आला नाही,म्हणून त्याच्या आई,वडिलांनी ठिकठिकाणी फोनवरून संपर्क करून विचारणा केली.२९ मार्चलाही कुठेच मिळाला नाही.मात्र ३० मार्च रोजी संतोषचा मृतुदेह जंगलातील लिंबाच्या झाडाला गळफास लावलेल्या परिस्थीत आढळला.
शवविच्छेदन करून आणलेला मृत्यदेह गाडीतच नातेवाईकांनी दोन ते तीन तासापासून चौकात ठेवला.

ही आत्महत्या नसून कटकारस्थान करून हत्या केली असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.जोपर्यंत आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात येणार नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही.अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस कार्यवाही सुरू होती. याप्रकरणी गडचांदूरचे DYSP सुशीलकुमार नायक, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार एस.पी.मडावी पुढील तपास करीत आहेत.