विजयकिरण फाउंडेशन तर्फे ब्रम्हपुरी येथे आज जाॅब महोत्सवचे आयोजन

152

ब्रम्हपुरी:

माजी मंत्री वडेट्टीवार यांचा पुढाकार – नामांकित कंपन्यांद्वारे 3 हजार युवकांना रोजगाराची संधी

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने विजय किरण फाउंडेशन तर्फे दि. 2 एप्रिल 2023 रोजी ब्रम्हपुरी येथील स्टेम पोदार लर्नं स्कुलमध्ये सकाळी 10 वाजता पासून सायंकाळी 5 पर्यंत जाॅब महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर जाॅब महोत्सवात 50 हुन अधिक नामांकित कंपन्यांच्या द्वारे 3 हजारांपेक्षा अधिक जाॅब व्हॅकन्सी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

करिअरच्या सुरूवातीला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाली नाही म्हणून ग्रामीण भागातील हजारो तरुण- तरुणी शैक्षणिक गुणवत्ता व पात्रता असूनही त्यांच्या स्वप्नातील क्षेत्रात करिअर घडवू शकत नाही आणि मागे राहून जातात. म्हणूनच ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही तालुक्यातील सुशिक्षित व कुशल तरुण तरुणींना यशस्वी करिअरची सुरुवात करण्याची संधी मिळावी, त्यांच्या शैक्षणिक पात्रतेला न्याय मिळावा व भविष्यात उंच भरारी घेता यावी तसेच त्यांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने माजी मंत्री, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून विजयकिरण फाऊंडेशन तर्फे भव्यदिव्य अशा या “जॉब महोत्सव 2023” चे आयोजन करण्यात आले आहे.

या जॉब महोत्सवात देशातील नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्र यामधील 3000 पेक्षा अधिक पदांसाठी जॉब उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. रिक्त पदांसाठी कंपन्यांकडून थेट इंटरव्ह्यू घेतले जाणार असून नोकरीस इच्छुक, पात्र उमेदवारांनी या जाॅब महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन राज्याचे माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.