- मूल :-तालुक्यातील केळझर अजयपूर मार्गावर शनिवारी वाटमारी झाली.यातील तिघांना रविवारी अटक करण्यात आली.सोमवारी आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद चिचपल्ली येथील विशाल राजकुमार दुधे यांनी दिली होती.
मूल पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, चिचपल्ली येथील टिव्ही मॅकेनिक राजकुमार दुधे हे शनिवारी आपल्या मामासोबत मोटार सायकलने केळझर येथे एका ग्रामस्थाकडे टिव्ही दुरूस्ती साठी गेले होते. काम आटोपल्या नंतर दुपारी तीन वाजताच्या दरम्यान गावाकडे परत जात असताना अजयपूर मार्गावर मरारसावली गावाजवळ तीघांनी यांच्याशी चाकूचा धाक दाखवून वाटमारी केली.तीनही आरोपी एकाच दुचाकीवर होते.त्यात त्यांनी विशाल दुधे यांच्या कडून चाकूचा धाक दाखवून बळजबरीने 640 रूपये खिशातून हिसकावले.झालेल्या घटनेची तक्रार दुधे यांनी मूल पोलिस स्टेशनला नोंदविली.तक्रारीच्या आधारे पोलिसांनी केळझरच्या दोन आरोपींना घरून तर एकाला बाहेरून अटक केली. आरोपींनी घटनेचा गुन्हा कबूल केला.त्यांच्या कडून 640 रूपये,गुन्हयात वापरलेली मोटार सायकल आणि चाकू ताब्यात घेतला.यात मॅक्सवेल उर्फ विकी,बळीराम मोटघरे,रा.केळझर आणि शाहरूख उर्फ सोहेल अयुफ शेख,रा.चिरोली या वीस ते पंचवीस वयोगटातील आरोपींना अटक करण्यात आली.यातील एक आरोपी विधी संघर्ष बालक आहे.या सर्व आरोपींना रविवारी अटक करण्यात आली. सोमवारी आरोपींना न्यायालयात सादर करण्यात आले.न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आरोपींविरूदध भादंवि 143,392,341,506(34)कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जून इंगळे आणि पोलिस निरिक्षक सुनिल परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक पंचबुदधे करीत आहे.
अंकूश बसणार :- चिरोली,केळझर ते अजयपूर,चिचपल्ली आणि जुनोना मार्गावर नेहमीच वाटमारी सारखे प्रकार घडतात.काही घटनांची पोलिसांत तक्रार केल्या जाते.तर काही घटना अशाच सुटतात.वनव्याप्त परिसराचा फायदा घेवून वाटमारी,लुटमारीच्या प्रकारात वाढ होत आहे.परंतु दुधे यांनी आपल्या वर बितलेल्या प्रसंगाची तक्रार केली.त्यामुळे या आरोपींकडून वाटमारीची बरीचशी माहिती तपासात उघड होण्याची शक्यता पोलिसांनी बोलून दाखविली आहे.याच मार्गावर झोपला मारोती असल्याने अनेक युवक युवती एकाच मोटार सायकलने या परिसरात फिरत असतात.त्यांनाही धमकावण्याचे प्रकार घडलेले आहेत.अशा प्रकारांवर आता अंकूश बसण्याची शक्यता पोलिसांनी बोलून दाखविली आहे.