पिपरी (देश) ग्रामस्थांची वेकोली महाप्रबंधक यांना पुराच्या समस्यांचे निवेदन आज वेकोली महाप्रबंधक आभाष चंद्र सिंह यांची पिपरी(देश) गावाला भेट…

306

भद्रावती: तालुक्यातील पिपरी येथील वेकोलीच्या ढीगाऱ्यांमुळे २०२२ मध्ये पिपरी (देश) आणि वर्धा नदिजवळील गावांना पुराचा मोठा फटका बसला होता. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये याबाबत वेकोली प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मात्र त्यांनी कुठलाही ठोस पाऊल उचलले नाही.यामुळे आणखी त्याच समस्यांचा पाठपुरवठा करण्यासाठी पिपरी येथील ग्रामस्थांच्या वतीने सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी गुरुवारी महाप्रबंधक आभाष चंद्र सिंह यांची भेट घेतली. ग्रामस्थांनी त्यांच्या ऊर्जाग्राम येथील कार्यालयात जाऊन समस्या मांडल्या.त्यांनी पुराचे गांभीर्य समजून घेत २८ ऑगस्टला भेट देणार असल्याचे सांगीतले.

तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांची भेट घेऊन R.O प्लांटचे काम पूर्ण करण्यात यावे. तसेच नवीन ग्रामपंचायत भवन मंजूर करण्यात यावे. वर्षाअगोदर तयार करण्यात आलेल्या सौर ऊर्जा लाईटची दुरुस्ती करण्यात यावे.असे निवेदन देण्यात आले.तहसिल कार्यालय येथील नायब तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आले.
यावेळी सरपंच अर्चनाताई नांदे,उपसरपंच पंकज खटाले,ग्रामपंचायत सदस्य संदीप कुटेमाटे, सुनीता दर्वे, काजल चव्हाण ,विजय मडावी, कविता कुटेमाटे आणि ग्रामवासी उपस्थित होते.