गोंडपिपरी (ता.प्र) :– गोंडपिपरी पंचायत समितीची वर्षे २०२२ -२०२३ ची वार्षिक आमसभा खैरे कुणबी सभागृह गोंडपिपरी येथे सकाळी ११:३० वाजता लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. संत गाडगे बाबा आणि संत तुकोडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून आमसभेला सुरूवात करण्यात आली.
या प्रसंगी तहसीलदार राजेश मडामे, गट विकास अधिकारी शालीकराव मावलीकर, उप कार्यकारी अभियंता (महावितरण) कातकर सर, उपविभागीय अभियंता सा. बा. उपविभाग पोंभुर्णा खापणे सर, उपविभागीय अभियंता सा. बा. उपविभाग गोंडपिपरी राजेश चव्हाण, उपविभागीय अभियंता सिंचाई प्रियंका रायपुरे, सरपंच समितीचे अध्यक्ष देविदास सातपुते यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित विभागाची सविस्तर माहिती घेऊन त्यावर ग्रामपंचायतीमधील हरकती जानून घेतल्या, गोंडपिपरी तालुक्यातील अडचण लक्षात घेता शेतकरी अपघात झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान तातडीने मिळणे संबंधाने अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले पाहिजे, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत १२ महिने पाणी साठा असणाऱ्या ठिकाणी स्त्रोतांचे निर्मिती करणे, तालुक्यातील प्रत्येक विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे, शाळेच्या वेळेवर व सुटल्यावर राज्य परिवहन महामंडळ मानव मिशनच्या बसेस नियमित सुरु ठेवणे बाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, शाळेतील पोषण आहार घेतेवेळीस सरपंच यांनी चौकशी करून घ्यावी. हायब्रीड एन्यूईटी अंतर्गत सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करणे, शेतकऱ्यांना कृषी पंप व इतर नागरिकांना घरगुती वीज पुरवठा करून देणे, मुख्यालयी राहून कामे पूर्ण करणे, जनताजनार्धनाला विकासाचा केंद्रबिंदू मानून त्यांच्या जीवनातील मुलभूत समस्या सोडविण्यासाठी पोटतिडकीने काम करा असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत,या प्रसंगी अनेक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.