टोमॅटोचा भाव वाढला, अन्य भाजीपाला कडाडला… दरात तिप्पटीने वाढ; मॉन्सून लांबल्याने उत्पादनावर परिणाम, बजेट बिघडले…-विशाल शेंडे

1053

चंद्रपूर: जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन उशीरा झाले. त्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या उत्पादनावर झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून आवाक्यात असलेल्या भाजीपाल्याचे भाव दुप्पट तिप्पटीने वाढले आहे. वीस ते तीस रुपये किलोने मिळणारा टोमॅटो शंभरावर पोहोचला आहेत. कोथिंबीरचे दर दोनशे रुपये किलो आहे. भाजीपाल्यांचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट बिघडले आहे.चंद्रपूर शहरात नागपूर, मध्यप्रदेशातून भाजीपाला विक्रीस येतो. तालुक्यातील खेड्यापाड्यातून येथील गंज वॉर्ड बाजार, टिळक मैदानातील बाजार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारात भाजीपाला येतो. साधारणपणे जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होते.यंदा मात्र जून महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली. त्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या उत्पादनावर झाला. त्यामुळे भाजीपाल्यांच्या किमतीत दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भाजीपाल्यांचे दर वाढल्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.भाजीपाल्यांचे दर वाढल्याने होती.. बाजारात सर्वसामान्य ग्राहक भाजीपाला खरेदी करण्यास मागेपुढे पाहत आहे. सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर ताण पडला आहे. शहरातील गोल बाजारातील भाजीविक्रेत्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्यांचे दर वाढले आहे.काही महिन्याभरापूर्वी टोमॅटो वीस ते तीस रुपये किलो होते. आता त्याचे भाव १०० ते १२० रुपये किलोवर येऊन पोहोचले आहे. कांदे पूर्वी ३० रुपये किलोने विकल्या जात होते. आता कांद्याचे दर चाळीस रुपये झाले आहे. पूर्वी मिरची ८० ते १०० रुपये किलो

आता दोनशे रुपये झाले. कोथिंबीर पूर्वी १२० रुपये किलो होते. त्यात किलो, आलु ३० रुपये किलो, भेंडी ६० आता दुप्पट वाढ झाली आहे. कोबी रुपये, वांगे ६० रुपये, भोपळा ४० रुपये १२० रुपये किलो, शेंगा १२० रुपये किलो, शिमला मिर्चीचा भाव सध्या ८० रुपये किलो आहे. भाव कमी असल्याने ग्राहक जास्त प्रमाणावर भाजीपाला खरेदी करायचे. मात्र, भाव वाढल्यापासून कमी प्रमाणावर खरेदी करीत असल्याचे सांगितले.

कोड:

भाजीपाल्याचे दर वाढल्याने
दुकानदाराकडून भाजीपाला खरेदी करण्यास ग्राहक मागेपुढे पाहत आहे. गृहिणींचेही बजेट बिघडले आहे. बाजारातून दोन किलो घेणारी वस्तू आता एक ते अर्धा किलोच घेत आहे. महागाई अशीच वाढत राहिल्यास भाजीचे दुकान बंद करण्याची वेळ येईल. .

– प्रकाश बोबाटे, भाजीविक्रेता, चंद्रपूर.